मोजो ब्रिस्टो आग : काकूला वाचवता वाचवता दोन भावांनी गमावला जीव!
मुंबईतल्या कमला मिल कम्पाऊंड परिसरातील `मोजो ब्रिस्टो` पबमध्ये लागलेल्या आगीत १५ जणांना आपले प्राण गमवावे लागले. या मृतांमध्ये तीन परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. हे तीघेही अमेरिकेहून नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी भारतात दाखल झाले होते.
मुंबई : मुंबईतल्या कमला मिल कम्पाऊंड परिसरातील 'मोजो ब्रिस्टो' पबमध्ये लागलेल्या आगीत १५ जणांना आपले प्राण गमवावे लागले. या मृतांमध्ये तीन परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. हे तीघेही अमेरिकेहून नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी भारतात दाखल झाले होते.
गुरुवारी रात्री २६ वर्षीय धैर्य ललानी आपला भाऊ विश्वा (२३ वर्ष) आणि काकू प्रमिला केनिया (७० वर्ष) तसंच मुंबईतल्या एका नातेवाईकासहीत डिनरसाठी मोजो बिस्ट्रो लाऊंजमध्ये आला होता. धैर्य कामानिमित्तानं गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेत स्थायिक झाला होता.
पबमध्ये आग लागल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला. या दरम्यान धैर्य, विश्वा आणि प्रमिला यांच्यासोबत या आगीत फसला... प्रमिला या वॉशरुममध्ये अडकल्या होत्या... त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात धैर्य आणि विश्वा हे दोघेही आगीत होरपळले गेले.
'ऑल वुमन लास्ट नाईट'
'ऑल वुमन लास्ट नाईट' थीमवर याच पबमध्ये आणखी एक वाढदिवसाची पार्टी सुरू असल्याचं समजतंय. आग लागल्यानंतर उपस्थित महिलांनी स्वत:ला वाचवण्यासाठी वॉशरुममध्ये कोंडून घेतलं. मृतांमध्ये ११ महिलांचा समावेश आहे... धुरामुळे गुदरमरून त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांना अनेक महिलांचे मृतदेह वॉशरुमध्ये आढळले.
भारती दोषी बचावल्या...
मोजो रेस्टोपबमध्ये लागलेल्या आगीच्या प्रत्यक्षदर्शी भारती दोशी या दुर्घटनेत थोडक्यात बचावल्या, पण दोशी यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांना मात्र, आपला जीव गमवावा लागला. दोशी यांच्या भगिनी प्रमिला केनिया आणि दोन भाचे धैर्य लालानी आणि विश्व लालानी यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. या दुर्घटनेत दोशी यांनी काल मध्यरात्री अनुभवलेते ते काही भीषण तास, कुटुंबतल्या मृत्यू झालेल्या सदस्यांशी त्यांचा झालेला शेवटचा संवाद आणि त्य़ांची नेमकी व्यक्तिमत्व कशी होती हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी...