अमित झा आत्महत्येप्रकरणी तत्कालिन पोलीस निरीक्षक युनुस खानना अटक
विरारमधील अमित झा आत्महत्येप्रकरणी विरारचे तत्कालिन पोलीस निरीक्षक युनूस शेख यांना मुंबईतून अटक करण्यात आलीय.
मुंबई : विरारमधील अमित झा आत्महत्येप्रकरणी विरारचे तत्कालिन पोलीस निरीक्षक युनूस शेख यांना मुंबईतून अटक करण्यात आलीय. पोलिसांच्या आणि एका राजकीय नेत्याच्या त्रासाला कंटाळून विकास झा यानं वसई पोलीस उप अधीक्षक कार्यालयासमोर आत्महत्या केली होती.
भावाच्या मृत्यूला जबाबदार असणा-यांवर कारवाई होत नसल्यानं विकासच्या भावानं देखील विष पिऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर झा कुटुंबियांच्या तक्रारीवरुन पोलीस निरीक्षक यूनुस शेख, राजकारणी मुनाफ बालोच तसंच आणखी दोघांवर गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली होती. मात्र यूनुस शेख आणि मुनाफ बलोच यांना अटक होत नव्हती. मुनाफ बलोच हा या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे. तर युनुस शेख यांना या घटनेनंतर निलंबित करण्यात आलं होतं.