मुंबई : भाजपचे अध्यक्ष अमित शाह  यांनी  'समर्थन वाढीसाठी लोकसंपर्क' अभियानावर भर दिलाय. शाह हे सेलिब्रिटीज, क्रिकेटर यांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज मुंबईत त्यांनी अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने हिची भेट घेतली. माधुरीचा नवा मराठी सिनेमा 'बकेटलिस्ट' याचा धागा पकडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या खास व्यंगचित्रातून शाह यांच्या मुंबई दौऱ्याचा समाचार घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


अमित शाह यांनी  बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितसह उद्योगपती रतन टाटा यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मात्र, प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांचीही भेट घ्यायची होती. मात्र, आजाराचे कारण देऊन लतादीदी यांनी भेट नाकारली. अमित शाह हे  'समर्थन वाढीसाठी लोकसंपर्क' अभियानासाठी जनतेची भेट घेण्याची गरज होती. मात्र, नसे होताना दिसत नाही. याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. हाच धागा पकडत राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून अमित शाह यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. 


अमित शाह त्यांच्या हातातील यादी पाहत असून त्यामध्ये माधुरी, लतादीदी, कपिलदेव, उद्धव, मिल्खासिंग ही नावे आहेत. त्याचवेळी शाहनी खरंतर ज्या भाजप कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांना प्रोत्साहित करणे अपेक्षित होते. तोच भाजप कार्यकर्ता अमित शाह त्यांची बकेट लिस्ट तपासत असताना त्यांच्याकडे आशाळभूतपणे पाहत असल्याचे दाखवण्यात आले आहे. राज यांनी आपल्या व्यंगचित्रातून भाजपवर नेमका निशाणा साधला आहे.