मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आजपासून तीन दिवसांच्या मुंबई दौ-यावर येत आहेत. कर्जमाफीच्या मुद्यावरून सत्ताधारी भाजप-शिवसेनेत श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. शिवसेनेसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेतेही सरकारच्या कारभारावर जाहीर टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा मुंबई दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील आगामी राजकारणाच्या दृष्टीनं काय फासे टाकावेत, याचा आढावा घेण्यासाठी अमित शाह येणार असल्याचं समजतं आहे. मात्र याशिवाय अमित शाहांच्या मुंबई दौ-याचा आणखी एक खास हेतू असल्याचं सांगितलं जातंय. दादर-माहिमचा परिसर म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यात भाजपची पाळंमुळं कशी रूजवता येतील, यादृष्टीनं ते या भागातील स्थानिक लोकांशी संवाद साधणार असल्याचं समजतं आहे. पण भाजपला ते सहज शक्य होणार नाही, असं स्थानिक शिवसेना-मनसे नेत्यांचं म्हणणं आहे. 


दौ-या दरम्यान अमित शाह मातोश्रीवर जाणार असल्याचीही चर्चा आहे. राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह शिवसेना पक्षप्रमुखांची भेट घेणार आहेत.. तसेच घटकपक्षांच्या प्रमुखांशी देखील चर्चा करणार आहेत.