मुंबई: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा रविवारी मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पक्षाच्या 'संपर्क फॉर समर्थन' या अभियानाअंतर्गत गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची भेट घेतली. यावेळी अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार हेदेखील उपस्थित होते. 


अमित शहा आणि लता मंगेशकर यांनी तब्बल तासभर चर्चा केली. यावेळी लता मंगेशकर यांनी भाजपच्या कामाचं कौतूक केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. यापूर्वीच्या मुंबई दौऱ्याच्यावेळी अमित शहा यांनी अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि उद्योजक रतन टाटा यांची भेट घेतली होती.