दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : भारतीय मातीत तयार झालेल्या पहिल्या वहिल्या विमानाची चाचण्या घेण्यास डीजीसीएनं परवानगी दिली आहेत. 


डीजीसीआयकडे नोंदणी रखडली होती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमोल यादव यांनी आपलं सर्वस्व पणाला लावून तयार केलेल्या विमानासाठी, डीजीसीएचे रजिस्ट्रेशन मिळावे यासाठी अर्ज 2011 केला होता. पण लालफितीच्या कारभारात अडकल्यानं नियमात असुनही डीजीसीआयकडे ही नोंदणी रखडली होती. 


पाठपुराव्याला ६ वर्षांनी यश


झी मीडीया आणि अमोल यादव यांच्या पाठपुराव्याला ६ वर्षांनी यश आलंय. अखेर डीजीसीआयने त्यांच्या सहा आसनी विमानाला नोंदणी दिली आहे.  भारतातील पहिले विमान बनवण्याचा आणि रजीस्ट्रेशन करण्याचा मान मराठी तरुणाला प्रक्रिया पूर्ण करून या विमानाला परमीट टु फ्लाय म्हणजेच विमान उडवण्याच परवाना मिळु शकेल


10 दिवसात 'परमिट टू फ्लाय'


अमोल यादव यांनी प्रमाणपत्र मिळाल्यावर गेल्या तीन साडे तीन वर्षात झी 24 तासनं केलेल्या पाठपुराव्याबद्दल आभार मानले. आणि पुढच्या 10 दिवसात परमिट टू फ्लाय मिळेल अशी आशा व्यक्त केली.