मुंबई : सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP leader and Maharashtra Social Justice Minister Dhananjay Munde of rape)  धनंजय मुंडे यांच्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी रात्री उशिरा महत्वाचा निर्णय घेतला आहे. धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. यावरून सर्वच स्तरावरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. मुंबईत प्रफुल्ल पटेलांच्या घरी झालेल्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत राजीनाम्याबद्दल महत्वाचा असा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बलात्काराच्या आरोपावरून धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार नाहीत, असा महत्वाचा निर्णय पक्ष वरिष्ठांच्या बैठकीत घेण्यात आला. मुंबईत प्रफुल्ल पटेलांच्या घरी झालेल्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत निर्णय झाला. रेणू शर्माविरोधात ब्लॅकमेलिंगच्या तीन तक्रारी आल्यानं धनंजय मुंडे सेफ असल्याचं म्हटलं आहे. 


धनंजय मुंडेवर थेट बलात्काराचे आरोप करण्यात आले. इतकंच नाही तर स्वत: धनजंय मुंडे यांनी लग्नाच्या बायकोशिवाय आपले आणखी एका महिलेसोबत संबंध होते आणि तिच्यापासून आपल्याला दोन मुलं असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. पण त्याच महिलेच्या धाकट्या बहिणीने आता बलात्काराचा आरोप केल्याने धनंजय मुंडे यांची राजकीय कारकिर्दच पणाला लागली आहे.


सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर रेणू शर्मा नावाच्या महिलेनं बलात्काराचे गंभीर आरोप केलेत. त्यावरून मुंडेंना राजीनामा द्यावा लागतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. रेणू शर्मा नावाच्या महिलेने बलात्काराचे गंभीर आरोप केल्यानं धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आलेत.



त्यात भाजप नेत्यांनी त्यांच्याविरोधात मोर्चेबांधणी सुरू केल्यानं मुंडेंना राजीनामा द्यावा लागणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. खरं तर धनंजय मुंडेंनी बुधवारीच पवारांना या प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली. त्यापूर्वी त्यांनी फेसबूकवर या प्रकरणाचा खुलासा केला होता.