मुंबई : ही बातमी तुमच्या मुलांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे. कारण ओमायक्रॉनचा लहान मुलांना जास्त धोका असल्याचं समोर आलं आहे. ओमायक्रॉनबद्दल एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. ओमायक्रॉन लहान मुलांवर हल्ला करतोय. महाराष्ट्रात सापडलेल्या ओमायक्रॉनच्या रुग्णांबद्दलही हे निरीक्षण आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिंपरीत ज्या सहा जणांना ओमायक्रॉन झाला आहे. त्यांच्यापैकी 3 लहान मुलं आहेत. बारा वर्षांच्या, सात वर्षांच्या आणि दीड वर्षाच्या मुलीला ओमायक्रॉनची लागण झाली आहे.  5 वर्षांखालील मुलांमध्ये ओमायक्रॉन वेगानं पसरत असल्याचं निरीक्षण आहे.



दक्षिण आफ्रिकेतही ओमायक्रॉनबाधित लहान मुलांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी विशेष वॉर्डसही तयार करण्यात आलेत. त्यामुळे लहान मुलांच्या लसीबद्दल लवकर निर्णय घेण्याची मागणी जोर धरतेय.


ओमायक्रॉन घातक नसला तरी तो प्रचंड संक्रमक आहे. दोन डोस घेतलेल्यांनाही ओमायक्रॉन होत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे बुस्टर डोसचीही मागणी वाढू लागलीय. 


कोरोनाला घाबरण्यापेक्षा त्याच्याशी लढणं गरजेचं आहे. लस, सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क ही सगळ्यात मोठी हत्यारं आहेत. सावध राहा आणि काळजी घ्या. कोरोनाशी लढाई अजून संपलेली नाही.