Anant Radhika Engagement Video : रिलायन्स कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांच्याकडे आनंदाचं वातावरण आहे. त्यांचा लाडका आणि धाकटा लेक बोहल्यावर चढणार आहे. गुरुवारी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या सारखपुड्याची ग्रँण्ड पार्टी झाली. या पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. या हाय प्रोफाईल एंगेजमेंट पार्टीला  सेलिब्रिटीची मांदियाळी होती. आर्यन खानपासून ऐश्वर्या राय बच्चनपर्यंत अनेक सेलिब्रिटीने हजेरी लावली. (Anant ambani Radhika Merchant engagement vidoe Mukesh Ambani Nita Ambani all bollywood celebrity under one roof antilia mumbai in marathi news ) 


सेलिब्रिटीची मांदियाळी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरुख खान, आणि सलमान खानपासून ते अक्षय कुमार, जॉन अब्राहम, अनन्या पांडे आणि अर्जुन कपूरपर्यंत - जवळजवळ संपूर्ण बॉलीवूड मुंबईतील अँटिलिया या अंबानीच्या घरात एकत्र आली होती. 




ऐश्वर्या राय बच्चन आपली मुलगी आराध्यासोबत भारतीय पोशाखात आली होती. तर पॉवर कपल रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी त्यांच्या एंट्रीने लक्ष वेधून घेतलं. 




कार्यक्रमात दिसलेल्या इतर सेलिब्रिटींमध्ये करण जोहर, मनीष मल्होत्रा, सारा अली खान आणि ओरहान अवत्रामणी यांचाही जलवा दिसून आला. 



या सोहळ्यासाठी मुकेश अंबानी यांचे धाकटे भाऊ अनिल अंबानी आणि टीना अंबानीही आले होते. दोघेही पारंपारिक ड्रेसमध्ये दिसून आले. 





यासोबतच अनेक स्पोर्ट्स आणि बॉलिवूड स्टार्सनेही सहभाग घेतला होता. यामध्ये सचिन तेंडुलकर, अक्षय कुमार, ऐश्वर्या राय, श्रेया घोषाल यांच्यासह अनेक दिग्गजांचा समावेश होता.




कॅमेऱ्यासमोर या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण अंबानी कुटुंब एकत्र आले. मुकेश अंबानी, नीता अंबानी, मोठा मुलगा आकाश, सून श्लोका, मुलगी ईशा आणि जावई आनंद पिरामल, धाकटा मुलगा अनंत आणि त्यांची होणारी छोटी सून राधिका...



नीता अंबानी यांनी छोट्या सूनबाई राधिका हिचं पारंपारिक पद्धतीने स्वागत केलं. गुजराती विधीनुसार होणाऱ्या सुनेचं जोरदार स्वागत करण्यात आलं. 




या सोहळ्यात अंबानी कुटुंबियातील महिलांनी सोहळ्याला एकत्र गाण्यावर एण्ट्री केली. या व्हिडीओने सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतलं आहे. 



एकंदरीत लग्न होईपर्यंत अजून काही दिवस या लग्न सोहळ्यातील अनेक क्षण आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत राहणार आहेत.