मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : कोविडच्या (Corona Virus) दोन वर्षांच्या निर्बंधांतून मुक्त होत यंदा मुंबईत धुमधडाक्यात गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) साजरा झाला. मुंबईत पुन्हा एकदा तोच उत्साह गणेशोत्सवादरम्यान पहायला मिळाला. अनंत चतुर्दशीला (Anant Chaturdashi 2022) मुंबईकरांनी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.  (anant chaturdashi 2022 mumbaikars have reported less immersion in artificial ponds this year compared to 2021 for ganesh immersion)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत अनंत चतुर्दशीला लाखो गणरायांचं विसर्जन करण्यात आलं. मुंबईमध्ये एकूण  1 लाख 93 हजार 0622 गणेश मूर्तींचे समुद्रात विसर्जन करणयात आलं. तर मुंबईत विविध ठिकाणी बांधण्यात आलेल्या कृत्रिम तलावात 66 हजार 127 गणरायांचं विसर्जन करण्यात आलं. 


यंदा मुंबईकरांनी मागील वर्षीच्या तुलनेत कृत्रिम तलावात कमी बाप्पांचं विसर्जन केल्याची नोंद पालिकेकडे झाली आहे. कृत्रिम तलावात गेल्या वर्षी 82 हजार 61 गणेश मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले होतं.


मुंबईत यावर्षी 9 हजार 967 सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्ती विसर्जित करण्यात आल्या. तर 1 लाख 76 हजार 300 घरगुती गणपती विराजमान झाले होते. याशिवाय 6 हजार 795 गौरी विराजमान झाल्या होत्या.


घरगुती गणरायांचं कृत्रिम तलावात सर्वाधिक विसर्जन


यंदा घरगुती गणपतींचे सर्वाधिक विसर्जन हे कृत्रिम तलावात करण्यात आलं. 61 हजार 985 घरगुती गणपती बाप्पा हे कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात आले. तर 1 हजार 822 सार्वजनिक गणेश।मंडळांनी त्यांचे बाप्पा कृत्रिम तलावात विसर्जित केले. याशिवाय 2 हजार 320 गौरींचं कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आलं.