Ananya Sanman : पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना अनन्य सन्मान जीवन गौरव पुरस्कार
`हा सन्मान पाहायला दीदी हवी होती....` पंडित हृदयनाथ मंगेशकरांना दाटला कंठ
मुंबई : समाजातल्या विविध क्षेत्रांमध्ये अनन्य साधारण योगदान देणा-या विभूतींचा झी २4 तास अनन्य सन्मान हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यंदाचा अनन्य सन्मान जीवन गौरव पुरस्कार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना देण्यात आला.
पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना या वर्षीचा अनन्य सन्मान जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. या पुरस्कारानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 'मी झी वाहितीने मनापासून आभार मानतो. हा माझा सन्मान पाहायला दीदी हवी होती. आज ती नाहीय त्यामुळे मला फारसा आनंद होत नाही.'
'दीदी आज नाहीय आज इथे एवढा प्रकाश पडलाय पण का कुणाच ठाऊक मी मात्र अजूनही अंधारतच आहे. दीदी आणि मी 80 वर्षांची आमची संगती होती. वयाच्या 5 व्या वर्षापासून तिने जे मला सांभाळायला सुरुवात केली ते अगदी 6 तारखेपर्यंत...'
पंडित हृदयनाथ यांनी लतादीदींची आठवण काढताना मान्यवर, कलाकार आणि उपस्थित सर्वांच्याच पापण्या पाणावल्या. उपस्थितांमध्ये वेगळीच शांतता होती. राज ठाकरेंनीही लता दीदींच्या काही खास आठवणी यावेळी सांगितल्या.
हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यासपीठावर लता मंगेशकर अर्थात लतादीदींची आठवण हा पुरस्कार घेताना काढली. अनन्य सन्मान पुरस्कार सोहळ्याला केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत अन्नय सन्मान पार पडला.