मुंबई : मानधन वाढीचा प्रस्ताव रखडल्यानं राज्यातील २ लाख १० हजार अंगणवाडी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर जात आहेत. त्यामुळे आज अंगणवाड्या उघडणार नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अब्दुल कलाम आहाराचे काम करणार नाही, पल्स पोलिओ लसीकरण आदी कामे राज्यात कोठेही होणार नसल्याचे येथील महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीचे निमंत्रकांनी सांगितलं आहे.


 संपाच्या कालावधीदरम्यान १२ सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर मोर्चा नेऊन अंगणवाडी सेविका आपल्या हक्काची मागणी लावून धरणार आहेत.


या बेमुदत संपाचा परिणाम ठाणे जिल्ह्यातील अंगणवाड्यांसह कुपोषित बालकांच्या पोषण आहार वितरणावर होणार आहे. जिल्ह्यात एक हजार ८५४ अंगणवाडी केंद्रे आहेत. 


त्याद्वारे ठाणे, कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, मुरबाड, डोळखांब, शहापूर आदी नऊ  बाल प्रकल्पांतील सुमारे १ लाख १५ हजार बालकांसह आठ हजार ४७१ कुपोषित आणि १३९ तीव्र कुपोषित बालकांच्या अंगणवाडी सेवेवर परिणाम होणार आहे.