सुधीर मुनगुंटीवार चेहऱ्यावर असं कोणतं दु:ख लपवतात, जे अनिल देशमुखांना दिसतं?
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत माजी मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांना चिमटे काढले. सुधीर मुनगुंटीवार यांचं ते दु:ख अनिल देशमुख यांनी
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत माजी मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांना चिमटे काढले. सुधीर मुनगुंटीवार यांचं ते दु:ख अनिल देशमुख यांनी बॉलीवूडच्या एका गाण्यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यावर अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे, सुधीरभाऊ तुमच्या मनातलं दु:ख आम्हाला कळत होतं, मागील पाच वर्षापासून तुम्ही तुमचं दु:ख मनात लपवून ठेवलं.
गृहमंत्री अनिल देशमुख यांचे विधानसभेत सुधीर मुनगुंटीवार यांना चिमटे काढत या विषयावर म्हणाले, "सुधीरभाऊ देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा तुम्ही सिनियर होता, मात्र पाच वर्ष तुम्ही तुमचं दुःख लपवलं, तुमच्या मनातलं दुख आम्हाला कळत होतं, सिनियर असून मुख्यमंत्री होता आलं नाही हे तुमचं दुःख होतं"
यावरच अनिल देशमुख थांबले नाहीत, तर आणखी थेट बॉलीवूडच्या गाण्याचा संदर्भ देत म्हणाले, "तुम्हाला पाहून मला जगजितसिंह यांची एक गझल आठवतेय, तुम इतना क्यू मुसकुरा रहे हो, क्या गम है जो छुपा रहे हो, आँखो में नमी, हँसी लबो पे, क्या हाल है क्या दिखा रहे हौ, सुधीरभाऊ यांची अशी अवस्था होती".