माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पुन्हा ईडीची कोठडी
Money Laundering Case : मनी लाँड्रिंग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज दिलासा मिळाला नाही.
मुंबई : Money Laundering Case : मनी लाँड्रिंग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 15 नोव्हेंबरपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची अर्थात ईडी (ED) कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना जामीन मिळू न कल्याने त्यांचा मुक्काम कोठडीत असणार आहे. ( Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh sent to Enforcement Directorate custody till 15th November)
अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, त्यांना तिथे दिलासा मिळाला नाही. ईडीने (ED) आपल्याविरुद्ध कोणतीही कारवाई करु नये यासाठी अनिल देशमुख यांनी याचिका दाखल केली होती. ईडीने अनिल देशमुख यांना तीनवेळा समन्स बजावलं होतं, पण प्रकृतीचं कारण पुढे करत अनिल देशमुख ईडीसमोर हजर झाले नव्हते.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचा आरोप केला होता. त्यामुळे देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून देशमुख यांची केंद्राच्या विविध पथकांकडून चौकशी सुरू आहे. ईडीने देशमुख यांच्या नागपूरसह मुंबईच्या घरी छापे टाकले होते. हा तपास तब्बल दहा तास चालला. काही कागदपत्रे पथकाने जप्त केले. कारवाईच्या वेळी अनिल देशमुख हे मुंबईत होते.
दरम्यान, अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पलांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे या दोघांना ईडी विशेष न्यायालयाने कोठडी सुनावली होती. आयपीएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्यांमध्ये अनिल देशमुख यांची भूमिका होती, असे संजीव पलांडे याने ईडीला दिलेल्या जबाबात सांगितल्याचा दावा ईडीने केला आहे.