मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी अभिनेत्री kangana ranaut कंगना राणौत आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीवरुन बेकायदा बांधकामाबाबतचा मुद्दा अधोरेखित केला. यावेळी त्यांनी राज्यपालांची कंगनाची भेट घेण्याची बाब खटकल्याचाही सूर आळवला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील कंगनाच्या कार्यालयावर पालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी बीएमसीची ही कारवाई योग्य नसल्याचं म्हटलं होतं. ज्यानंतर बी- टाऊनची ही 'क्वीन' राज्यपालांच्या भेटीला गेली. 


कंगनाचं राज्यपालांना भेटणं राजकीय वर्तुळात मात्र अनेकांना रुचलं नाही. याचविषयी नाराजीचा तीव्र सूर आळवत अभिनेत्री कंगना राणौत हिच्या राज्यपाल भेटीबाबत अनिल परब यांनी आपली भूमिका मांडली. 


 


कंगनाच्या कार्यालयाच्या बांधणीमध्ये काही नियमांचं उल्लंघ करण्यात आल्याची बाब समोर आली होती, असं पालिकेकडून सांगत सदर प्रकरणात पुढील कारवाई करण्यात आली होती. त्याच धर्तीवर वक्तव्य करत परब म्हणाले, 'बेकादेशीर काम करणाऱ्यांना राज्यपाल भेटत असत असतील, तर फक्त कंगनाला का भेटता ? बेकायदा बांधकामं तुटलेल्या सामान्य लोकांनाही भेटावं. तिचं बांधकाम तुटल्यावर इतका पोटशूळ का ?' मर्यादा दोन्ही बाजूंनी पाळाव्यात, असं परब म्हणाले.