अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर भाजपाचा एवढा आटापिटा का? अनिल परब यांचा सवाल
अर्णब गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर भाजपाचा एवढा आटापिटा का होत आहे. हा भाजपाचा पोपट पिंजऱ्यात बंद झाल्यानंतर...
मुंबई : अर्णब गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर भाजपाचा एवढा आटापिटा का होत आहे. हा भाजपाचा पोपट पिंजऱ्यात बंद झाल्यानंतर भाजपाने एवढा काय त्रास होतोय, अशी टीका शिवसेना नेते अनिल परब यांनी केली आहे. अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक झाली आहे. चौकशी करण्यासाठी ही अटक आहे.
चौकशीतून योग्य ते समोर येणार आहे. दोन वर्षापासून अन्वय नाईक यांचे कुटूंबीय न्याय मागण्यासाठी दरवाजे ठोठावत होते, त्यांना अजून न्याय मिळू शकलेला नाही. पण आता महाविकास आघाडीने त्यांना न्याय देण्याचा निर्णय घेतला आणि या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
तेव्हा हे प्रकरण मुळीच वृत्तपत्र स्वातंत्र्य किंवा आणीबाणीशी संबंधित नाही. या प्रकरणी फिरोज शेख, नितेश सारणा यांना देखील अटक झाली आहे, पण यांच्याविषयी अजून कुणीही एक शब्द बोललेलं नाही. पण फक्त भाजपाने अर्णब गोस्वामी यांच्यासाठी एवढा आटापिटा का चालवला आहे, असा सवाल अनिल परब यांनी केला आहे.
तसेच तरूण तेजपाल यांन भाजपाचं स्टिंग ऑपरेशन केलं होतं, म्हणून तरुण तेजपाल याच्यावर बलात्काराचा आरोप लावला का? असं आता आम्ही म्हणायचं का? असा देखील सवाल अनिल परब यांनी केला आहे.
अर्णब गोस्वामी अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी रिपब्लिकन चॅनेलचे संपादक अर्नब गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर, भाजपाने ही अटक म्हणजे वृत्तपत्र स्वातंत्र्यावर गदा असल्याची टीका केली होती. तसेच ही आणीबाणीसारखी ही स्थिती केल्याचं म्हटलं होतं, या टीकेला शिवसेनेचे अनिल परब यांनी उत्तर दिले आहे.