मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्याला आपच्या आंदोलनामुळे गालबोट लागलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिरात पार पडत असलेल्या कार्यक्रमाचा अंजली दमानिया यांनी निषेध केलाय.


सुनील तटकरेंच्या कारकिर्दीचा लेखाजोखा मांडणा-या पुस्तकाचं शरद पवारांच्या हस्ते प्रकाशन झालं. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र, मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. तर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.


सुनील तटकरेंवर सिंचन घोटाळ्याचे आरोप असताना सरकारमधले मंत्री कार्यक्रमाला उपस्थित असल्यामुळे दमानियांनी निषेध नोंदवत रवींद्र नाट्य मंदिरबाहेर आंदोलन केलं. मात्र, पोलिसांनी त्यांना त्यांच्या समर्थकांसह ताब्यात घेतलंय.


राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या तीन दशकांच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीवर आधारित समग्र या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं.