मुंबई : शिवसेनेसाठी आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण 38 आमदार फुटल्यानंतर आता आणखी एक आमदार आणि मंत्री शिंदे गटात सहभागी होण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडून शिवसेनेला आणखी एक झटका दिला जाणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर ही आमदार गुवाहटीला पोहोचत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत गुवाहाटीच्या मार्गावर असल्याची माहिती पुढे आली आहे. ते देखील सध्या नॉट रिचेबल आहेत.



एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत शिवसेनेचे जवळपास 38 आमदार गुवाहटीत आहेत. त्यासोबतच त्यांना आणखी 10 अपक्ष आमदारांचा देखील पाठिंबा आहे. त्यामुळे जवळपास 50 आमदार शिंदे गटात आहेत.



एकनाथ शिंदे यांच्याविरोधात काही ठिकाणी शिवसैनिकांकडून आंदोलन होत असताना काही ठिकाणी त्यांच्या समर्थनात देखील मोर्चे निघत आहेत. काही ठिकाणी बंडखोर आमदारांच्या कार्य़ालयाची तोडफोड देखील करण्यात आली. काही ठिकाणी आमदारांचे बॅनर्स फाडण्यात आले तर काही ठिकाणी त्यांच्या फोटोला काळं फासण्यात आलं.



उद्धव ठाकरे यांच्यासोबत विधानसभेतील कॅबिनेट मंत्री म्हणून फक्त आदित्य ठाकरे उरले आहेत. याशिवाय सुभाष देसाई आणि अनिल परब हे आणखी दोन मंत्री आहेत. पण हे दोघेही विधान परिषदेचे सदस्य आहेत. दुसरे कॅबिनेट मंत्री शंकरराव गडाख हे क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे आहेत.