CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis : मुंबई : आताची सर्वात मोठी बातमी. पोलिसांच्या बदल्यांवरुन चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात मतभेद असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्यामधल्या मतभेदांमुळेच पोलिसांच्या बदल्या रखडल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Difference between Eknath Shinde and Devendra Fadnavis over police transfer)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात सारं काही आलबेल आहे का, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी एकाच व्यासपीठावर येणे टाळले आहे. काल दिवसभर दोन्ही नेत्यांचे सोबत कार्यक्रम होते. परंतु हे नेते एकमेकांसोबत कार्यक्रमात आले नाहीत. त्यामुळे त्यांच्यात मतभेद असल्याचे बोलले जात आहे. 


अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरुन दोघांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळतेय. शनिवारी रात्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची वर्षावर एक बैठक झाली. या बैठकीतही पोलिसांच्या बदलीवर चर्चा झाली पण दोघांमध्ये एकमत झालं नसल्याचं कळतंय. त्यानंतर रविवारी शिंदे आणि फडणवीसांनी एकाच व्यासपीठावर येण्याचं टाळल्याचंही बोललं जात आहे.


दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. आज दिल्ली दौऱ्यावरबाबत उत्सुकता व्यक्त होत आहे. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत माघार आणि इतर विषयावर केंद्रीय नेत्याशी चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील राजकीय मुद्द्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. आज भाजपच्या निवडणूक समितीची बैठक आहे. त्यात फडणवीस सहभागी होणारेत. त्यात हिमाचलच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार आहे.
 
दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांना मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री  फडणवीस यांनी समज दिली. संतोष बांगर यांच्या विविध घटनेमुळे सरकारची बदनामी होत असल्याचे सांगत समज दिली. मतदार संघातील कामे प्रशासकिय नियमानुसार करुन घ्या, विरोधकांना टिकेची संधी देऊ नका, असा सल्ला देखील देण्यात आला.