मुंबई : अर्णब गोस्वामी यांचा आजचा मुक्काम न्यायालयीन कोठडीतच असणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात जामिनावरील सुनावणी टळली आहे. उद्या पुन्हा होणार न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे अर्णब गोस्वामींचा कोठडीतला मुक्काम वाढला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, अलिबाग न्यायालयातील जामीन अर्ज अर्णब यांच्या वकिलांनी मागे घेतला आहे. दोन ठिकाणी जामीन अर्ज दाखल केल्याने सुनावणीबाबत अडचण होण्याची शक्यता होती. त्यामुळे अलिबाग न्यायालयातील जामीन अर्ज मागे घेतला आहे. दरम्यान,  अर्णब गोस्वामींच्या मुंबई उच्च न्यायालयातील जामीन अर्जावरील सुनावणी उद्यापर्यंत टळली आहे. उद्या दुपारी पुन्हा जामिनावर सुनावणी होणार आहे. 



दरम्यान अर्णबनं अलिबाग कोर्टातला जामीन अर्ज मागे घेतला. अलिबाग न्यायालयातील अर्ज मागे घेतल्यानंतरच उच्च न्यायालयात सुनावणी शक्य होती. या तांत्रिक अडचणीमुळे अर्णब यांच्या जामिनावरील सुनावणी आज होऊ शकली नाही, असे सांगण्यात येत आहे.


अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सारडा यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी बुधवारी रात्री दिले. यानंतर तिन्ही आरोपींची रवानगी अलिबाग मध्यवर्ती कारागृहाच्या क्वारंटाईन सेलमध्ये करण्यात आले आहे. त्यांना अन्य कैद्यासमवेत तिघांना ठेवण्यात आले आहे.


कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन अलिबाग मध्यवर्ती कारागृहाने नगर पालिकेच्या शाळा इमारतीत क्वारंटाईन सेल स्थापन केला आहे. या क्वारंटाईन सेलमध्ये कारागृहात नव्याने दाखल होणाऱ्या कैद्यांना ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अर्णब यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर याच क्वारंटाईन सेलमध्ये ठेवण्यात आले आहे. जामीन होत नाही तोवर याच क्वारंटाईन सेल मध्ये त्यांचा मुक्काम असणार आहे. या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.


दरम्यान, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणातील अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सारडा या तिन्ही आरोपींनी मुख्य न्यायंदडाधिकारी यांच्या न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले आहेत. त्याजामीन अर्जांवर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.