आर्यन खानला आज जेल की बेल? भाजप नेत्याकडून समर्थन
आर्यन खान प्रकरणाला राजकीय वळण, भाजप नेत्याकडून समर्थन
मुंबई : क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात (Cruise Drugs Party Case) अटकेत असलेल्या बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Bollywood Actor Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) जामीन मिळणार की नाही? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. बुधवारी आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. आज जर आर्यनाला जामीन मिळाला नाही तर त्याचा तुरूंगातील मुक्काम वाढणार आहे. दरम्यान आर्यनच्या ड्रग्स प्रकरणाला आता राजकीय वळण लागलं आहे.
भाजपचे आमदार राम कदम यांनी ट्विट करून म्हटले आहे की, 'आर्यन खानला आज जामीन मिळावा अशी प्रार्थना करतो. जामीन मिळणे हा संविधान आणि कायद्यानुसार प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. ही एका विशिष्ट व्यक्तीविरुद्धची लढाई नाही, तर संपूर्ण मानव जातीचे अंमली पदार्थाविरोधी युद्ध आहे....' असं ट्विट करत राम कदम यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला आहे.
आज कोर्टात काय होऊ शकतं
जामीन मंजूर झाल्यास कागदोपत्री कारवाईनंतर आर्यन खानची सुटका होऊ शकते. मात्र, अर्ज नामंजूर झाल्यास आर्यन खानचा जेलमधील मुक्काम वाढणार आहे. जामीन नाकारल्यास आर्यन खानचे वकील हायकोर्टात जाऊ शकतात.
आर्यन खानसोबत अरबाझ मर्चंट आणि मूनमून धमेचा यांच्या जामीन अर्जावरही आज सुनावणी होणार आहे. मुंबईत समुद्रात क्रुझवर ड्रग्स पार्टी करणाऱ्या आर्यन खानसह आठ जणांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या (NCB) अधिकाऱ्यांनी 2 ऑक्टोबरला अटक केली होती. त्यानंतर आर्यन खानसह सर्व आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आर्यन खानला सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात (Arthar Road Jail) आहे.