स्वतंत्र २८८ जागांची तयारी करून भाजप-सेना युतीत अडकणार?
राज्यात शिवसेना लहान भाऊ आहे हे स्वीकारल्यानंतरही उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा
कृष्णात पाटील, झी २४ तास, मुंबई : युती कधी जाहीर होणार याची भाजपा आणि शिवसेनेचे कार्यकर्ते वाट पाहत आहेत. पण युतीचं अजून काही ठरत नाहीय. त्यात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा संकल्प सोडल्यानं युतीचं काय होणार? अशी चर्चा रंगलीय.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असताना भाजपा शिवसेनेच्या युतीचं अजून ठरलेलं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नेते युती होणारच, असं छातीठोकपणे सांगत आहेत पण दुसरीकडं विधानसभेच्या २८८ जागांची तयारीही करत आहेत. शिवसेनेनंही २८८ जागांची तयारी केलीय.
राज्यात शिवसेना लहान भाऊ आहे हे स्वीकारल्यानंतरही उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा आहे.
अजून युती जाहीर झालेली नाही. जागावाटपाचं गुऱ्हाळ सुरू आहे. अशावेळी २८८ जागांची चाचपणी करून भाजपावर दबाव आणायचा आणि जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायच्या अशी रणनीती शिवसेनेची आहे. या रणनितीत सेना कितपत यशस्वी होतेय, हे पाहावं लागेल.