मुंबई : पंचांगातील नक्षत्र वाहनांवरून यावर्षी पाऊस वेळेवर व सरासरीएवढा समाधानकारक   पडेल असा अंदाज वर्तविण्यात आला असल्याचे पंचांगकर्ते,  खगोलअभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. यावर्षी सूर्याचा पर्जन्यनक्षत्र प्रवेश आणि वाहने पुढीलप्रमाणे आहेत. १) मृग ८ जून वाहन मेंढा, २) आर्द्रा २२ जून वाहन हत्ती , ३) पुनर्वसू ६ जुलै वाहन बेडूक ४) पुष्य २० जुलै वाहन गाढव, ५) आश्लेषा ३ आगस्ट वाहन घोडा, ६) मघा १७ आगस्ट वाहन उंदीर ७) पूर्वा फाल्गुनी ३० आगस्ट वाहन हत्ती ८)  उत्तरा फाल्गुनी १३ सप्टेंबर वाहन मेंढा ९) हस्त २७ सप्टेंबर वाहन म्हैस१०) चित्रा १० आक्टोबर वाहन कोल्हा, ११) स्वाती २४ आक्टोबर वाहन मोर असे आहे. बेडूक, म्हैस आणि हत्ती वाहन असता खूप पाऊस पडतो,मोर, गाढव आणि उंदीर वाहन असता अल्प पाऊस पडतो अशाप्रकाचे अंदाज सांगण्यात आलेले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सागराला येणार्या उधान भरतीच्यावेळी जर जास्त पाऊस पडला तर पाण्याचा निचरा न झाल्याने सखल भागांत पावसाचे पाणी तुंबण्याची शक्यता असते. साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीची भरती येण्याच्या तारखा, वेळ आणि उधान भरतीच्या पाण्याची उंची अशी माहिती  दा. कृ. सोमण यांनी दिली आहे. मात्र ही लाटांची उंची नाही असाही खुलासा त्यांनी केला आहे.


१). दि. १३ जून सकाळी ११-४३ वाजता ४.६८ मीटर.
२) दि. १४ जून दुपारी १२-३० वाजता ४.८५ मीटर.
३) दि. १५ जून दुपारी १-१८ वाजता ४.९२ मीटर.
४) दि. १६ जून दुपारी २-०६ वाजता ४.९१ मीटर.
५) दि. १७ जून दुपारी २-५६ वाजता ४.८२ मीटर.
६) दि. १८ जून दुपारी ३- ४७ वाजता ४.६५ मीटर.
७) दि १२ जुलै सकाळी ११-२७ वाजता ४.६५ मीटर.
८) दि. १३ जुलै दुपारी १२-१३ वाजता ४.८५ मीटर.
९) दि. १४ जुलै दुपारी १-॰२ वाजता ४.९६ मीटर.
१०) दि. १५ जुलै दुपारी १-४९ वाजता ४.९७ मीटर.
११) दि. १६ जुलै दुपारी २-३७ वाजता ४.८९ मीटर.
१२) दि. १७ जुलै दुपारी ३-२५ वाजता ४.७० मीटर.
१३) दि. १० आगस्ट सकाळी ११-११ वाजता ४.६० मीटर.
१४) दि. ११ आगस्ट सकाळी ११-५६ वाजता ४.८२ मीटर.
१५) दि. १२ आगस्ट दुपारी १२-४१ वाजता ४.९५ मीटर .
१६) दि. १३ आगस्ट दुपारी १-२६ वाजता ४.९६ मीटर.
१७) दि. १४ आगस्ट दुपारी २-०८ वाजता ४.८५ मीटर.
१८) दि. १५ आगस्ट दुपारी २-५२  वाजता ४.६२ मीटर