मुंबई : एटीएम मध्ये पैसे भरण्यासाठी आलेली गाडी घेऊन ड्रायव्हर फरार झाला आहे. मुंबईच्या गोरेगाव परिसरामधील ही घटना आहे. गाडीतील कर्मचारी पैसे भरण्यासाठी एटीएम मध्ये गेले असताना ड्रायव्हर गाडी घेऊन फरार झाला.


या गाडीमध्ये 4 कोटी रुपये असल्याची माहिती मिळत आहे. काही अंतरावर गेल्यानंतर ड्रायव्हर गाडीतील पैसे घेऊन फरार झाला आहे. पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली आहे. सध्या ड्रायव्हरचा शोध घेतला जात आहे.