मुंबई : मुंबईतून एका संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. या दहशतवाद्यानं पाकिस्तानमध्ये बॉम्ब बनवण्याचं ट्रेनिंग घेतलं होतं. एटीएसनं ही मोठी कारवाई केली आहे. हा दहशतवादी आत्मघातकी हल्ला करण्याच्या तयारीमध्ये होता, अशी माहिती समोर येत आहे. मुंबईमधला मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट यामुळे उधळला आहे. या संशयित दहशतवाद्याला २१ मेपर्यंत एटीएसच्या कोठडीत ठेवण्यात येणार आहे. ३१ वर्षांचा हा दहशतवादी पाकिस्तानला गेला होता. पाकिस्तानमधल्याच एका दहशतवाद्यानं त्याला पाकिस्तानमध्ये बोलावलं होतं. हा दहशतवादी पहिले दुबईला गेला आणि मग तिथून कराचीला गेला. त्यानंतर त्याला प्रशिक्षण  देण्यात आलं. या संशयित भारतात परत आल्यावर कोलकाता एसटीएफच्या मदतीनं एटीएसनं ही कारवाई केली आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्ती या संशयिताच्या रडारवर होत्या. पाकिस्तानमध्ये या इसमाला शस्त्रास्त्र चालवण्याचं प्रशिक्षण आणि वर्दळीच्या ठिकाणी हल्ला करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं, अशी माहिती एटीएसला मिळाली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING