मुंबई : चेंबूर येथे एका राजकीय नेत्यावर हल्ला करण्यात आलाय. कर्णबाळा दुनबळे यांच्यावर शनिवारी रात्री तलवारीने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झालेत. त्यांना सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दुनबळे यांच्या डोक्याला जखमा झाल्या आहेत. रुग्णालयात आणले तेव्हा नाकातूनही रक्तस्राव होत होता. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुनबळे यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून गेल्या आठवड्यात चेंबूरमधील राजकीय पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. त्यामुळे हा हल्ला राजकीय वादातून झाला की अन्य कारणाने झालाय. याचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, गेल्याच महिन्यात शिवसेना आमदार तुकाराम काते यांच्यावरही मानखुर्दमध्ये प्राणघातक हल्ला झाला होता. 


दुनबळेंच्या राहत्या घराजवळ सिंधी सोसायटीत हा प्रकार घडला. या हल्ल्याचे कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. दहा ते अकरा जणांच्या गटाने दुनबळेंवर लोखंडी रॉड, तलवारीने हल्ला केल्याचा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलाय. या हल्ल्याचा तपास चेंबूर पोलीस करत आहेत. फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.