मुंबई : प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी राज्यातल्या रिक्षाचालकांनी संपाचं हत्यार उपसलंय. ९ जुलैपासून रिक्षाचालक मालक संघटनेनं बेमुदत संपाची हाक दिलीय. विमा कंपन्या मनमानी पद्धतीने पैसे उकळत आहेत. स्वयंरोजगारितांसाठी कल्याण मंडळाची स्थापना करावी, रिक्षाचालकांना वैद्यकीय विमा आणि निवृत्तीवेतन लागू करावं या मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला आहे. राज्यातले जवळपास २० लाख रिक्षाचालक या संपात सहभागी होण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिक्षाभाडे वाढीसह रिक्षाचालकांना भविष्यनिर्वाह निधी तसेच एसआयसी सारख्या या योजनांमध्ये समाविष्ट करावा. लवकरात लवकर कल्याणकारी मंडळाचा गठण करावं या प्रमुख मागण्यांना घेऊन हा संप पुकारण्यात आला आहे. जोपर्यंत सरकार आमच्याशी वाटाघाटीला तयार होणार नाही, तोपर्यंत हा संप चालूच राहणार असल्याचं शशांक राव यांनी सांगितला आहे. आज त्यांनी मुंबई तसेच उपनगरात रिक्षाचालकांच्या भेटी घेऊन संघटनेची भूमिका स्पष्ट केली.