मुंबईकर प्रवाशांच्या खिशाला आता कात्री, टॅक्सी-रिक्षा भाडेवाढीची शक्यता
Auto Rickshaw-Taxi fare in Mumbai : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी. मुंबईत टॅक्सी आणि रिक्षातून प्रवास करणे आता महागणार आहे.
मुंबई : Auto Rickshaw-Taxi fare in Mumbai : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी. मुंबईत टॅक्सी आणि रिक्षातून प्रवास करणे आता महागणार आहे. त्यामुळे मुंबईकर प्रवाशांच्या खिशावर भार पडमार आहे. टॅक्सी, रिक्षा भाडेवाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबईत रिक्षा 2 रुपये तर टॅक्सीची 3 रुपयांची भाडेवाढीची शक्यता आहे. रिक्षाचं भाडे 21 वरुन 23 रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. तर टॅक्सीचे भाडे 25 रुपये होते. आता ते 28 रुपये होण्याची शक्यता आहे. पेट्रोल-डिझेलसह सीएनजी महागल्याने ही भाडेवाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबईतील ऑटो रिक्षाचे भाडे लवकरच वाढू शकते, रिक्षा युनियनने तसा इशारा दिला होता. इंधनाच्या दरात झालेल्या वाढीनंतर हा इशारा देण्यात आला होता. सीएनजीच्या किमतीत नुकत्याच झालेल्या वाढीमुळे, आमच्या परिचालन खर्चात प्रति किमी 1. 31 रुपयांची वाढ झाली आहे. सध्या रिक्षाचे किमान भाडे 21 रुपये असून पहिल्या 1.5 किमीनंतर सध्या 14.20 रुपये प्रति किमी भाडे आहे.
त्याचप्रमाणे, मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने खटुआ समितीच्या अहवालानुसार, इंधन दरात 25 टक्के वाढ झाल्यानंतर, टॅक्सींच्या भाड्यातही सुधारणा करणे आवश्यक आहे. "म्हणून आम्ही किमान 5 रुपये भाडे वाढवण्याची मागणी करत केली आहे. मात्र, इतकी वाढेवाढ करणे शक्य नाही. त्यामुळे तीन रुपये भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. सध्या, किमान भाडे 1.5 किमीसाठी 25 रुपये आहे.
मात्र, शहरातील एका प्रमुख ऑटो युनियनचे नेते शशांक राव म्हणाले की, सरकारने टॅक्सी आणि रिक्षाचालकांना सवलतीच्या दरात सीएनजी उपलब्ध करुन द्यावा. भाडे वाढवणे हा योग्य उपाय नाही कारण त्याचा परिणाम सर्वसामान्यांवर होईल, ते म्हणाले.