मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर, दोन शिक्षक आणि एक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीसाठी मंगळवार 1 डिसेंबर रोजी मतदान झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी सुमारे 69.08 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मतदारसंघ निहाय औरंगाबाद पदवीधर 61.08 टक्के, पुणे पदवीधर 50.30 टक्के, नागपूर पदवीधर 54.76 टक्के, अमरावती शिक्षक मतदारसंघ 82.91 टक्के, पुणे शिक्षक मतदारसंघ 70.44 टक्के तर धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात सुमारे 99.31 टक्के मतदान झाले.


औरंगाबाद विभाग, ( मराठवाडा मतदानाची एकूण टक्केवारी 64.49). 2014 च्या तुलनेत 28 टक्के मतदान जास्त झाले आहे.