मुंबई : नॉन ब्रँडेड वस्तूंच्या पॅकेजिंगला प्लास्टिक बंदीमधून वगळलं जाण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज मंत्रालयात प्लॅस्टीक बंदीचा आढावा घेतला. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या दालनात झालेल्या या बैठकीला मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रविण परदेशी आणि पर्यावरण खात्याचे अधिकारीही उपस्थित होते. ब्रँडेड अन्नपदार्थांना प्लास्टिक बंदीतून वगळण्यात आलंय. त्यामुळे लहान व्यापाऱ्यांनीही आपल्याला सवलत देण्याची मागणी केलीये. यासाठी काही भागात बंदही पाळण्यात आलाय. त्यामुळे या व्यापाऱ्यांना बंदीतून वगळण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो.