बॅंकेचे व्यवहार करण्याआधी हे वाचा ! 2 दिवस अत्यंत महत्त्वाचे
ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची
मुंबई : शनिवार, रविवार बॅंक हॉली़डेनंतर सोमवारी बॅंकेचे व्यवहार (Bank Transaction) करायला जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. तुम्ही बॅंक व्यवहारासाठी घरातून बाहेर पडाल पण बॅंक बँक कर्मचारी (Bank Worker Strike) आजपासून दोन दिवसांच्या संपावर आहेत. बँकांचं खासगीकरण करण्यास कर्मचाऱ्यांनी विरोध केलाय. याचा परिणाम ग्राहकांच्या दैनंदिन बॅंक व्यवहारावर होऊ शकतो.
IDBI आणि अन्य दोन बँकांच्या खासगीकरणास (Privatization of banks) बॅंक कर्मचाऱ्यांनी (Bank Worker) विरोध केलाय. राज्यातील 50 हजार कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बॅंक व्यवहारांवर परिणाम होणार आहे.
बँक कर्मचाऱ्यांच्या नऊ संघटनांचा समावेश असलेल्या UFBUनं हा दोन दिवसांचा संप जाहीर केलाय. अर्थसंकल्प सादर करत असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बँकांचं खासगीकरण करणार असल्याचं जाहीर केलं होतं.
IDBI आणि LIC मधील व्यवहारातून 2019 पासूनच खासगीकरणाला सुरूवात झालीय. मात्र केंद्राच्या निर्णयाविरोधात कर्मचारी आक्रमक झालेत.