मुंबई :   बहुचर्चित आणि देशातील पहिलीच वॉटर टॅक्सी प्रकल्पाचे दोनच दिवसांपूर्वी थाटामाटात उद्गाटन झालं. दोनच दिवसांत वॉटर टॅक्सी सेवेचा गाशा गुंडाळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी मुंबई ते मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी वॉटर टॅक्सीचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. परंतू माफक दरांत जलसफरीचे सर्वसामान्यांचं स्वप्न अधुरेच राहणार आहे. 



या मार्गावरील 56 आसनी वॉटर टॅक्सी फक्त उद्घाटनापूर्ती सुरू केली असून, आता ही सेवा बंद झाली आहे. 


वॉटर टॅक्सीचे तिकीट दरही भरमसाट असल्याने ते परवडणारे नाही. यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केलीय.