बेस्ट भाडेवाढीची शक्यता
आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्टला सुस्थितीत आणण्यासाठी बेस्ट प्रशासनानं विविध सुधारणांना मंजुरी दिलीय. त्यामध्ये बेस्ट बस भाडेवाढीचाही समावेश आहे. त्यामुळं आता मुंबईकरांना भाडेवाढ सोसावी लागणाराय.
मुंबई : आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्टला सुस्थितीत आणण्यासाठी बेस्ट प्रशासनानं विविध सुधारणांना मंजुरी दिलीय. त्यामध्ये बेस्ट बस भाडेवाढीचाही समावेश आहे. त्यामुळं आता मुंबईकरांना भाडेवाढ सोसावी लागणाराय.
बेस्ट बजेट मुंबई महापालिकेच्या बजेटमध्ये समाविष्ट करण्याच्या प्रस्तावाला याआधीच मंजुरी मिळालीय. आता महापालिका सभागृहात भाडेवाढीचा प्रस्ताव मंजूर झाल्यावर नवी भाडेवाढ लागू होणार आहे.