मुंबई : विनावाहक बस सुरू करण्याच्या मुद्यावरून बेस्टमधील कामगार संघटना आक्रमक झाल्यात. बेस्ट खाजगीकरणाचा डाव असल्याचा आरोप करत 'बेस्ट संयुक्त कामगार कृती समिती'नं वडाळा डेपोबाहेर आंदोलन केलं. सध्या प्रायोगिक तत्वावर चर्चगेट ते फ्री प्रेस जर्नल आणि सीएसटी ते गेट वे ऑफ इंडिया मार्गावर विनावाहक बससेवा सुरू आहे. आगामी काळात विनावाहक बसेसची संख्या वाढवली जाणार आहे. बेस्टमधून कंडक्टरांना हद्दपार करण्याचा हा डाव असल्याचा आरोप कामगार नेत्यांनी केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, 'बेस्ट'चं मुंबई महापालिकेत विलिनिकरण करण्याची मागणी जोर धरु लागलीय. निवडणुकीत शिवसेनेनं बेस्टच्या विलिनीकरणाचं आश्वासन दिलं होतं. बीएमसीनं 'बेस्ट'ला २१०० कोटी रुपयांचं अनुदान दिल्यानंतरही बेस्ट कडून २२,५०० कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प सादर केलाय. 


अनुदान देऊनही बेस्टची स्थिती सुधारत नसल्यानं 'बेस्ट'च्या विलिनीकरणाबाबत शिवसेना साशंक आहे. भाजप आणि बेस्ट कामगार समितीही विलिनीकरसाठी आवाज उठवण्याच्या तयारीत आहे.