बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस नाहीच, सेनेची घोषणा कागदावरच
दिवाळी बोनसची रक्कम देण्यासाठी २२ कोटी रूपयांची गरज होती.
मुंबई : दिवाळी उलटली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पदरात अजून बोनसची रक्कम पडलेली नाही. यंदाच्या वर्षी बेस्ट कर्मचाऱ्यांना साडेपाच हजार रूपये दिवाळी बोनस देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र दिवाळी संपली तरी ४० हजार बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनसची रक्कम मिळालेली नाही. दिवाळी बोनसची रक्कम देण्यासाठी २२ कोटी रूपयांची गरज होती.
घोषणा कागदावरच
कोणत्याही परिस्थितीत यंदा बोनस देणारच, असा पवित्रा सत्ताधारी शिवसेनेनं घेतला होता.
मात्र प्रशासनाकडून निधीची तरतूदच करण्यात न आल्यानं, शिवसेनेची ही घोषणा अजून तरी कागदावरच आहे.
गेल्या वर्षी बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस दिल्यानंतर त्यांच्या पगारातून नंतर ती रक्कम वळती करून घेण्यात आली होती.
तर यंदाच्या वर्षी घोषणा करुनही शिवसेनेला अजून बोनस देता आलेला नाही.