Ganesh Visarjan: गणेश विसर्जनाची धावपळ सुरु आहे. तुम्हीही गणेश विसर्जनासाठी जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सात दिवसात मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर जाणाऱ्या गणेशभक्तांना स्टिंग रेचा दंश झाल्याच्या घटना समोर आल्यात. विसर्जनाच्या प्रत्येक दिवशी १० ते १५ जणांना समुद्री जीवांचा दंश होण्याची घटना घडलीय. ब्लू बॉटल किंवा स्टिंग रेचा सर्वाधिक धोका जुहू, गिरगाव, वर्सोवा किनाऱ्यावर आहे, याच ठिकाणी स्टिंग रे चावण्याच्या घटना प्रकर्षानं समोर आल्यात.


स्पेशल रिपोर्ट पाहा : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


  • स्टिंग रे’ला ‘पाकट’ असंही म्हणतात.

  • या माशाच्या शेपटीला एक काटा असतो.

  • जेव्हा संकट येतं तेव्हा हा मासा विंचवाप्रमाणे काट्याचा डंख मारतो.

  • या काट्यांमध्ये ह्युमोटॉक्सिक नावाचं विष असतं

  • त्याचा डंख इतका जोरदार असतो की माणसाचे प्राणही जाऊ शकतात.

  • त्या विषामुळे रक्तपेशींवर परिणाम होतो


स्टिंग रेचा धोका मुंबईच्या ज्या किनाऱ्यांवर आहे तिथे महापालिकेनं बॅरिकेट्स उभारलेत. तुम्हीही चौपाटीवर विसर्जनासाठी किंवा फिरण्यासाठी जात असाल तर सावधान...कारण जीवघेणा मासा किनाऱ्यावर फिरतोय.