सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या (Maharashtra Vidhan Parishad) नागपूर (Nagpur) आणि अकोला (Akola) या दोन जागांवर महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aaghadi Government) मोठा धक्का बसला आहे. नागपूरमध्ये भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी काँग्रेसच्या मंगेश देशमुख (Mangesh Deshmukh) यांचा १७६ मतांनी पराभव केला. बावनकुळे यांना ३६२ मतं मिळाली. तर काँग्रेसच्या मंगेश देशमुख यांना केवळ १८६ मतं पडली. इथं काँग्रेस-मविआची १६ मतं फुटली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अकोला-वाशिम-बुलडाणा जागेवर भाजपचे वसंत खंडेलवाल (Vasant Khandelwal) तब्बल ४४३ मतांनी विजयी झाले. तर तीनवेळा विजय मिळवलेल्या शिवसेनेच्या गोपीकिशन बाजरोरिया (Gopikishan Bajoria) यांना ३३४ मतांवर समाधान मानावं लागलं. खंडेलवाल यांनी बाजोरिया यांचा १०९ मतांनी पराभव केला. राज्यात सत्ता असूनही महाविकास आघाडी सरकारला जागा राखता आलेल्या नाहीत


मविआचा 'करेक्ट कार्यक्रम'
सत्ताधारी पक्षाची अकोला आणि नागपूर विधान परिषदेत मतं फोडत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस (Devendra Fadanvis) यांनी पुन्हा रणनिती यशस्वी कशी करता येते सिद्ध केलं. सहा पैकी चार जागा भाजपान विजयी मिळवल्या, तर सत्ता असून ही शिवसेना काँग्रेस फटका बसला. मुख्यमंत्री ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना देवेंद्र फडवणीस यांनी धक्का दिला. फडवणीस यांची यशस्वी रणनितीकार म्हणून परत सिद्ध केले. 


विधान परिषद निवडणूक मतदानाआधी फडवणीस यांनी नागपूर - अकोला इथं मतदारांशी संपर्क करत रणनिती रचली आणि त्यात ते यशस्वी झाले.  राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांचं सरकार असूनही जनाधार आपल्याच पाठीशी हे दाखवण्यात भाजप यशस्वी ठरलं आहे.  भाजपने अचूक रणनिती आखत नागपूर आणि अकोल्यात विरोधकांची मतं फोडली, त्यामुळे भाजपने मविआचा करेक्ट कार्यक्रम केल्याचं बोललं जात आहे. भाजपातून गळती होईल असा दावा करणाऱ्या सत्ताधारी पक्षाला फडणवीस यांनी झटका दिला.


तीन पक्षांमध्ये कुरबुरी
गेल्या दोन वर्षात विधान परिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या. या सर्व निवडणुका सत्तेत असलेले तीनही पक्ष एकत्र येऊन लढले. पण तीन पक्षांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं विधान परिषदेच्या निकालावरुन सिद्ध झालं आहे. एकटी भाजप या तिनही पक्षांना भारी पडल्याचं चित्र निकालाने पाहायला मिळालं.


चंद्रशेखर बावनकुळे पुन्हा राजकीय पुनर्वसन
तेली समजाचे ओबीसी मतदार यांना प्रतिनिधीत्व दिल्यामुळे विदर्भात भाजापाला भविष्यात फायदा होणार आहे. विरोधी पक्ष नेते देंवेंद्र फडवणीस आणि नितीन गडकरी यांनी बावनकुळे यांचं पुनर्वसन केल्याने विदर्भात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत भाजपाला अनुकूल वातावरण होण्यास मदत झाली आहे. 


महाविकास आघाडीसाठी वाईट संदेश
विदर्भात काँग्रेस आणि सेना यांचा सत्ताधारी म्हणून प्रभाव नाही हे या निमित्ताने पुन्हा समोर आलं आहे.  मतं फुटल्याने महाविकास आघाडीसाठी हा वाईट संदेश आहे.  अनिल देशमुख सध्या ईडी चौकशी भोवऱ्यात आहेत, त्याचा फटकाही काही प्रमाणात नागपूर - अकोला अमरावती इथं बसला.  काँग्रेस पक्षाचे उमेदवार आयत्यावेळेस बदलणे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची रणनिती सपशेल चुकली. 


मतदानाच्या एक दिवस आधी काँग्रेसने रविंद्र भोयर यांचा पाठिंबा काढत मंगेश देशमुख यांना मतदान करण्याचं आव्हान केलं, त्यामुळे उमेदवार निवडीवरुनच काँग्रेसमधला गोंधळ उघड झाला होता. त्याचा फटका काँग्रेसला बसला.


बजोरिया यांचा पराभव सेनेच्या जिव्हारी
अकोला - अमरावती सेनेचे उमेदवार बजोरिया यांचा पराभव सेनेला जिव्हारी लागणारा आहे.  शिवसेनेचे मुख्यमंत्री  आणि सत्तेत असूनही सेनेला पराभवाचा सामना करावा लागला. अकोला मतदारसंघात 98.30 टक्के मतदान झाले होते. या मतदारसंघात शिवसेना (shivsena) आणि भाजपमध्ये (BJP) लढत होती.  अकोला, वाशीम व बुलडाणा या तीन जिल्ह्याच्या संयुक्त मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात थेट लढत झाली. मात्र, या निवडणुकीत भाजपने बाजी मारत शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे.


सहा जागा विधान परिषद निकाल
विधान परिषदेच्या ६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने नागपूर, अकोला, मुंबई आणि धुळे-नंदुरबार अशा चार जागांवर बाजी मारली. तर शिवसेना (मुंबई) आणि काँग्रेस (कोल्हापूर) यांना प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावं लागल