मुंबई :आताची सर्वात मोठी बातमी. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना अजूनही जेलमध्ये राहायचं आहे. कारण संजय राऊत यांचा न्यायालयीन कोठडीत वाढ झाली आहे. संजय राऊत यांना 19 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहावं लागणार आहे. (Big Breaking Shivsena Sanjay Raut Custody extended till 19 september)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने 31 जुलैला रात्री उशिरा अटक केली होती. यानंतर 1 ऑगस्ट रोहेर संजय राऊत यांना कोर्टात हजर केले. ईडीला संजय राऊत यांची कोठडी मिळताच दुसऱ्या दिवशी ईडीने दोन ठिकाणी छापे मारले होते. 



दरम्यान राऊत यांच्या पाठोपाठ त्यांची पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने समन्स बजावले होते. त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार वर्षा राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाल्या होत्या. पत्राचाळ प्रकरण, अलिबागमधील जमिनीचे व्यवहार वर्षा राऊत यांच्या नावे झाल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला होता.