राकेश त्रिवेदी, झी मीडिया,मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या (Amit Shah) मुंबई दौऱ्यात सुरक्षेसंबंधी सर्वात मोठी चूक झाल्याचं (Big Lapse in SECURITY) समोर आलं आहे. एक अनोळखी व्यक्ती अमित शाहांच्या जवळ फिरत होती. धक्कादायक बाब म्हणजे संबंधित व्यक्तीनं आपण आंध्रप्रदेशातील एका खासदाराचा पीए असल्याचं सुरक्षारक्षकांना भासवलं आणि बराच वेळ तो अमित शाहांच्या अवती-भोवती फिरत होता. (unknown man wandered around the Home Minister for hours)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमित शाहांनी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यात सोमवारी लालबागच्या राजाचं (Lalbaugcha Raja) दर्शन घेतलं होतं. त्यानंतर भाजपच्या कार्यक्रमात त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधितही केलं होतं. अमित शाहांच्या याच दौऱ्यात अनोळखी व्यक्ती शाहांच्या भोवती फिरत होती. संशय आल्यानंतर मंत्रालयातील एका अधिकाऱ्यानं याची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करत त्या व्यक्तीला अटक केली आणि गिरगाव कोर्टासमोर हजर केलं. 


कोर्टानं संबंधित व्यक्तीला पाच दिवसांची कोठडी सुनावलीय. हेमंत पवार असं या व्यक्तीचं नाव आहे तो धुळ्यातील रहिवासी असल्याचंही समोर आलंय. फक्त प्रसिद्धीसाठीच हेमंतने असं केलं असावं असं त्याच्या वडिलांना वाटतंय.



मुंबई पोलिस हेमंत पवारची चौकशी करतायत, त्यानं असं का केलं, यामागचा हेतू काय आहे याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतायत. राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर अमित शाहांचा हा पहिलाच मुंबई दौरा होता. मात्र याच दौऱ्यात अक्षम्य अशी चूक अमित शहांच्या सुरक्षेत झालीय. अशी चूक परत होऊ नये याची काळजी घेणं गरजेचं आहे.