शरद पवारांच्या घराच्या सुरक्षेत मोठी चूक; पोलीस गुप्तचर विभागाचं मोठं अपयश?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानावर (सिल्वर ओक) हजारोंच्या संख्येने एस टी कर्मचाऱ्यांचे आंदोलक पोहचले.
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानावर (सिल्वर ओक) हजारोंच्या संख्येने एस टी कर्मचाऱ्यांचे आंदोलक पोहचले. कर्मचाऱ्यांनी पवारांच्या घरावर चप्पल आणि दगडफेक केली.
शरद पवार यांच्या घरावर अचानक हजारोंच्या संख्येने मोर्चा आल्याने तेथे उपस्थित असलेलेी पोलीसांची कुमक अपूरी पडू लागली. आमच्या 120 कर्मचाऱ्यांनी आत्महत्यांना शरद पवार, अजित पवार जबाबदार आहेत. असं आंदोलनकर्ते कर्मचारी म्हणत होते.
परंतू शरद पवार हे देशातील जेष्ठ नेते आहेत. राज्यातील महत्वाचे नेते आहेत. त्यांच्या घरावर हजारोंच्या संख्येने अचानक कर्मचाऱ्यांनी आक्रमक आंदोलन पुकारलं याची पोलीस प्रशासनाला साधी कल्पनाही नव्हती. असे दिसून येत आहे. आंदोलकर्ते पोहचले तेव्हा घराबाहेरील सुरक्षेसाठी उपस्थित पोलीस वगळता येथे कोणत्याही पोलिसांचा फौजफाटा उपस्थित नव्हता.
आंदोलनकर्ते आक्रमक होत, सिल्वर ओकवर पोहचल्यानंतरही अर्धा तास तेथे पोलिसांची अतिरिक्त कुमक पोहचली नव्हती. त्यामुळे पोलिसांच्या गुप्तचर खात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
साधारण दुपारी 4.00 च्या सुमारास मुंबईचे कायदा सुव्यवस्था सहआयुक्त विश्वास नागरे पाटील तेथे पोहचले. आणि त्यांनी आक्रमक आंदोलनकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.