सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी गूड न्यूज
मुंबई महापालिकेत लवकरच मोठ्या प्रमाणात मेगाभरती करण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात आणि मुंबई महापालिकेत नोकरीसाठी आग्रही असलेल्या तरुणांसाठी गूड न्यूज आहे. मुंबई महापालिकेत लवकरच मोठ्या प्रमाणात मेगाभरती करण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता सरकारी नोकरीसाठी उत्सूक असलेल्या तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे. (big news ban on recruitment in bmc mumbai municipal corporation from 2019 will be lifted soon)
मुंबई महापालिकेत 2019 पासूनची नोकर भरतीवर बंदी टाकण्यात आली होती. ही 3 वर्षांपासून असलेली बंदी लवकरच हटवण्यात येणार असल्याचं समजतंय. त्यामुळे लवकरच महापालिकेत तब्बल 5 हजार पदांची भरती होणार, असा दावा कामगार संघटनांनी केला आहे.
कामगार संघटना आणि पालिका आयुक्तांची बैठक झाली. या बैठकीत मुंबई महापालिकेतील भरतीबाबतचा मुद्दा उपस्थित केला गेला. यानंतर प्रशासनाने नोकर भरतीवरील बंदी उठवण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलंय.
मात्र बंदी उठवली असली तरी, नक्की किती जागांसाठी पदभरती केली जाणार, याचा निर्णय हा पालिका आयुक्त घेणार आहेत. पालिकेत गेल्या तीन वर्षांत भरती झालेली नाही. त्यामुळे अनेक तरुण नोकर भरतीकडे डोळे लावून बसले आहेत. तसेच महापालिकेत सुमारे 30 ते 40 हजार पदे रिक्त असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे आगामी काळात नक्कीच मेगाभरती होईल, याबाबत शंका नाही.