आमदारांपाठोपाठ खासदारांचाही उद्धव ठाकरेंना धक्का; बैठकीतील गैरहजरीने चर्चांना उधान
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर सेना खासदारांची बैठक आयोजित केली होती. त्यासाठी 10 खासदार मातोश्रीवर पोहोचले आहेत.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर सेना खासदारांची बैठक आयोजित केली होती. त्यासाठी खासदार मातोश्रीवर पोहोचले आहेत. या बैठकीत शिवसेनेचे लोकसभेतील 18 पैकी 10 खासदार उपस्थित होते. शिवसेनेचे 40 आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला सामील झाल्याच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर खासदारांच्या गैरहजेरीमुळे पुन्हा राजकीय चर्चांना उधान आले आहे.
आज शिवसेनेची मातोश्रीवर आयोजित केलेल्या खासदारांच्या बैठकीत गजानन कीर्तीकर, अरविंद सावंत, विनायक राऊत, हेमंत गोडसे मातोश्रीवर दाखल झालेत. त्यात लोकसभेतले 10 खासदार दाखल झालेत.
राष्ट्रपती निवडणूकीत कुणाला मतदान करायचे यावरून दोन मतप्रवाह शिवसेनेत दिसून येत आहेत. त्यामुळे या मुद्यावर चर्चा होवू शकते तसेच अनेक खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळं शिवसेना खासदारांना एकसंध ठेवण्याच्या दृष्टीने या बैठकीत भर असेल.
बैठकीला गैरहजेर असलेले खासदार
१.यवतमाळ-वाशिम - भावना गवळी
२.पालघर - राजेंद्र गावित
३.परभणी - संजय जाधव
४.कोल्हापूर - संजय मंडलिक
५.हिंगोली - हेमंत पाटील
६.कल्याण-डोंबिवली - श्रीकांत शिंदे
७.रामटेक - कृपाल तुमाने
८.ठाणे - राजन विचारे
९. दादरा-नगर हवेली - कलाबेन डेलकर