Mumbai Water Shortage: मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. भरपावसात मुंबईकरांना पाणीकपातीच्या समस्येला सामोर जावे लागत आहे. दरम्यान यातून आता मुंबईकरांची सुटका होणार आहे. मुंबईची तहान भागवणाऱ्या तलावांत दररोज सरासरी पाऊस पडतोय. त्यामुळे धरणांतील पाणीसाठा हळूहळू वाढू लागलाय. यामुळे लवकर मुंबईतील पाणीपुरवठा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांत सध्या २ लाख ६४ हजार 657 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा 76 दिवस पुरेल एवढा आहे.. दरम्यान पावसाचा जोर कायम राहिल्यास लवकरच मुंबईकरांची पाणीकपातीपासून सुटका होणार आहे. 


महानगरपालिका क्षेत्रात 10 टक्के पाणी कपात 


मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये दमदार पावसाअभावी पुरेसा पाणीसाठा नसल्याने शनिवार दिनांक 1 जुलै 2023 पासून संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 10 टक्के पाणी कपात लागू करण्यात आली होती. त्यामुळे सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे महानगरपालिकेकडून आवाहन करण्यात आले.


यावर्षी पावसाळ्यास बराच विलंब झाला असून महाराष्‍ट्रात पावसाचे उशिरा आगमन झालेले आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असण्‍याबाबतचे अनुमान वर्तवण्‍यात आलेले आहे. 


मुंबईत गेल्या दोन-तीन दिवसांपासून रिमझिम पाऊस बरसतोय.मात्र संध्याकाळनंतर पूर्व उपनगरात जोरदार पाऊस सुरू झाला होता. चेंबूर,कुर्ला,मानखुर्द,विक्रोळी, घाटकोपर परिसरात पावसाची संततधार पाहायला मिळाली. असाच जोरदार पाऊस बरसला तर सखल भागात पाणी भरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.