मुंबई : गेले दोन दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळतो. मुंबईकरांचे या तुफान पावसात खूप हाल झाले आहेत. रविवारी दुपारी पावसाचा जोर कमी झाला, मात्र चार वाजल्यानंतर पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. मुंबईतील अनेक सखल भागात पावसाचं पाणी जमा झालं. ( Big Salute! Mumbai Police helped injured Father-Daughter )यामुळे सामान्यांची खूप गैरसोय झाली. अशावेळी मुंबई पोलिसांनी आपलं कर्तव्य अचूक बजावलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुसळधार पावसात रस्त्यावरून जखमी वडिल आणि मुलगी जात होते. हा व्हिडीओ रात्रीचा असल्याचं दिसतं. गुडघ्याभर साचलेल्या पावसातून मुंबई पोलिसांनी बाप-लेकीला बाहेर पडण्यास मदत केल्याचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. #आम्हीड्युटीवरआहोत असा हॅशटॅग देत हा व्हिडीओ मुंबई पोलिसांनी शेअर केला आहे. 



हा व्हिडीओ कांदिवलीमधील असल्याची माहिती मिळत आहे. मात्र नेमका परिसर कोणता? आणि काय घडलं आहे? याबाबत माहिती मिळालेली नाही. पण भर पावसात मुंबईकरांच्या सेवेसाठी मुंबई पोलीस कार्यरत असल्याच या व्हिडीओहून अधोरेखित होत आहे.


हवामान विभागाने मुंबईसह चार जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना पुढचे 24 तास अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील तीन तास या चारही जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस कोसळू शकतो, असा इशारा हवामान विभागाने दिला असून, नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.