मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत हॉटेल ट्रायडंट येथे आमदारांची बैठकी सुरु आहे. महत्त्वाचं म्हणजे या बैठकीला शिवसेनेचे 14 खासदार (Shivsena MP) हे थेट दिल्लीतून ऑनलाईन सहभागी झाले आहेत. राष्ट्रपती निवडणुकीनंतर 14 खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याची माहिती पुढे आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजच्या बैठकीत शिंदे गट ठराव मांडून कार्यकारिणीची घोषणा करणार आहे. दुसरीकडे शिवसेनेतून हकालपट्टी आणि राजीनाम्याचे सत्र सुरूच आहे. पण असं असताना देखील शिंदे गटात सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. शिंदे गटाकडून लवकरच प्रमुख नेत्यांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत.


अरविंद सावंत, विनायक राऊत, गजानन किर्तीकर आणि ओमराजे निंबाळकर वगळता इतर 14 खासदार या बैठकीला ऑनलाईन उपस्थित असल्याची माहिती पुढे येते आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आता उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सगळयांचं लक्ष लागलं आहे.


दुसरीकडे आज पक्ष विरोधी कारवाया केल्याने रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची शिवसेनेतून हाकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे.