मुंबई : मराठीचा अपमान करणाऱ्या गायक जान कुमार सानू विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहण्यात आलं. हा वाद चिघळण्यापूर्वीच कलर्स वाहिनीनं या प्रकरणात दिलगिरी व्यक्त करण्यात आली. कलर्स वाहिनीने चूक मान्य करत माफी मागितली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा जान सानू हा बिग बॉस १४ व्या सीझनमध्ये स्पर्धक आहे. या सीझनमध्ये राहुल वैद्य, निक्की तांबोळी आणि जान सानू यांच्यात वाद झाला. तेव्हा मराठी भाषेची चीड येते असं म्हणतं जान सानूने मराठी भाषेचा अपमान केला. 



यानंतर मनसे आणि शिवसेनेकेडून धमकीवजा इशारा देण्यात आले आहेत. तसेच जानने मराठी भाषेचा अपमान केल्याप्रकरणी माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. तर त्या अगोदरच कलर्स वाहिनीकडून माफीनामा जारी करण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांना कलर्सकडून पत्र लिहिलं आहे ज्यामध्ये माफी मागितली आहे. 


अमेय खोपकर यांनी ट्विट आणि व्हिडिओ द्वारे जान सानूला धमकीवजा इशारा दिला आहे. 'मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू तेच बघतो आता मी. लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. आता आम्ही मराठी लवकरच तुला थोबडवणार. कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केलं नाही ते बरं झालं, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजलं,' असं म्हणत खोपकर यांनी जान सानू याला धमकीवजा इशारा दिला.