Maharashtra Politics : भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांमधील (Deepak Kesarkar) वाद शिगेला पोहोचलाय. सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंना बदनाम करण्यासाठी राणेंनी प्रयत्न केले, असा खळबळजनक आरोप दीपक केसरकर यांनी केला होता. त्यावरून आता राणे-केसरकर संघर्ष टोकाला गेलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केसरकर यांच्या वादग्रस्त विधानामुळे शिंदे गट अडचणीत येत असल्याचं पाहाताच केसरकर यांनी आमच्यात कोणताही वाद नाही अशी सारवासारव केली. माझ्या प्रत्येक बोलण्याचा अर्थ नारायण राणे यांच्याशी जोडणं चुकीचं आहे, यापुढे पत्रपकार परिषदेत मी राणेंचं नाव घेणार नाही, असं केसरकर यांनी स्पष्ट केलं.


पण हा वाद थांबण्याची चिन्ह नाहीत. आता माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्विट करत दीपक केसरकर यांना डिवचलं आहे. निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय 'दिपक केसरकर म्हणतो मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे, नोकरी मागायची आहे तर नीट मागा, १ तारखे पासून आमच्याकडे ड्रायव्हर ची जागा रिकामी आहे'



दीपक केसरकर यांना ताकिद?
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केसरकर यांच्याविरोधात मोठा निर्णय घेतला आहे. केसरकर यांच्या वादग्रस्त विधानामुळे शिंदे गट अडचणीत येत असल्याने लवकरच किरण पावसकर यांच्याकडे प्रवक्तेपदाची जबाबदारी जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.


केसरकर यांनी भाजप आणि शिंदे गटात दुरी निर्माण होईल, अशी विधानं करू नयेत, अशी ताकीद शिंदे यांच्याकडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. शिंदे गट गुवाहाटीला गेल्यानंतर त्यांची भक्कम बाजू केसरकर यांनी मांडली होती.