मुंबई : भाजपाच्या स्थापनादिनाचं औचित्य साधून आज मुंबईत पक्षानं मोठं शक्तीप्रदर्शन आयोजित केलंय. आज मुंबईतल्या बांद्रा कुर्ला कॉम्पेक्समध्ये असणाऱ्या एमएमआरडीए ग्राऊंडमध्ये कार्यकर्त्यांच्या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. त्यात 3 लाखापेक्षा जास्त कार्यकर्ते उपस्थित राहतील असा पक्षाचा प्रयत्न आहे   राज्यातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी राजकीय सभा ठरेल असा प्रदेश भाजपचा दावा आहे. 2014 पासून राज्यात विविध निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त भाजपाने हा महामेळावा भरवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पक्षाचा आधारस्तंभ असणारे 80 हजार पेक्षा जास्त बूथ प्रमुख , कार्यकर्ते, गावपातळीपासून प्रदेश पातळीपर्यतचे पदाधिकारी , सरपंच, नगरसेवक, नगरपरिषद - पंचायत समिती - जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, मंत्री असे सर्व एका छताखाली येणार आहेत. यानिमिताने भाजपचे नेते पक्षाची काही वेगळी भूमिका जाहीर करतात का याकडे लक्ष लागलेले असेल. या सभेनिमित्त मुंबईतल्या वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत.  भाजप कार्यकर्त्यांना नागपूरहून घेऊन येणारी विशेष गाडी वेळेआधीच मुंबईकडे रवाना, कार्यकर्ते 5 तास स्टेशनवर रखडले


वाहतूक कोंडीचा त्रास 


वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर बीकेसीकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी एससीएलआर मार्गावरुन प्रवास टाळण्याचं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे. पूर्व उपनगरातील मुंबईकरांनी जेव्हीएलआर, एलबीएस रोड, ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे या मार्गांचा, तर पश्चिम उपनगरातील प्रवाशांनी एसव्ही रोड, लिंकिंग रोड या मार्गांचा वापर करावा, असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे.