Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार तयार केली जाते आहे. मुंबई भाजपने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला सुरुवात केली आहे. यानिमित्ताने मुंबई भाजपकडून सहा डिजीटल प्रचार रथाचे उद्घाटन करण्यात आले.  मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते दादरमधील मुंबई भाजपा कार्यालयाच्या आवारात प्रचार रथाचा शुभारंभ करण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सहा डिजीटल प्रचार रथाच्या माध्यमातून मुंबईतील सहा लोकसभा क्षेत्रातील मुंबईकरांपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासकामांची माहिती पोहोचवली जाणार आहे.  यावेळी आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली. अन्य पक्षांच्या तुलनेत भाजपाने प्रचाराच्या सर्वच आघाड्यांवर आघाडी घेतली असून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत भाजपा पोहोचली आहे, असे आशिष शेलार यांनी म्हटले. 


"विरोधक झोपेत असताना भाजपचे पदाधिकारी कामाला लागलेत"


"मुंबईतील महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका अशा सर्व घटकांची संपर्क आणि संवाद साधण्याचे काम सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पक्षाने केले आहे. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रत्येक पोलिंग स्टेशनवर सुपर वॉरिअरची सक्षम व्यवस्था उभी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता मेहनत घेत आहे. निवडणूक संचालन समितीची बैठका होत आहेत. विरोधक झोपेत असताना भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते झटून कामाला लागले आहेत. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक संचालन समितीच्या बैठका यशस्वी होत आहेत. योजनांच्या लाभार्थ्यांची संवाद साधला जात आहे", असेही आशिष शेलार यांनी सांगितले.


"विकसित भारत म्हणजे ती घोषणा अथवा नारा नाही तर १४० कोटी भारतीयांचे स्वप्न आहे. २०४७ मध्ये भारत स्वातंत्र्याचे शंभरावे वर्ष पूर्ण करेल त्यावेळी भारत अविकसित किंवा विकसनशील नसेल तर विकसित देश असेल. हे १४० कोटी भारतीयांचे स्वप्न आहे. ते स्वप्न पूर्ण करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकसित भारत यात्रा सुरू आहे", असेही ते म्हणाले.



"प्रचाराला थेट सुरुवात म्हणून हा उपक्रम"


"मुंबईकरांसाठी भारतीय जनता पक्ष नेहमीच पुढे राहिला आहे. शहरात शंभरहून अधिक ठिकाणी आधार कार्ड, मेडिकल चेकअप, डिजिटल इंडिया यासारखे उपक्रम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून यशस्वीरित्या राबविण्यात आले आहेत. काम करणाऱ्या महिलांना वसतिगृह, युवकांशी, अल्पसंख्यांक बांधवांशी स्नेहसंवाद असे उपक्रम राबविण्यात येत आहेत. लोकसभा निवडणुकीची पहिली यादी सुद्धा भारतीय जनता पक्षाने जाहीर केली. माहिती घटक पक्षांबरोबर प्रचाराला थेट सुरुवात म्हणून आजचा हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येत आहे", असे आशिष शेलार यांनी सांगितले. 


"एक करोड चाळीस लाख मुंबईकरांपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासकामांना पोहोचवण्याचा संकल्प मुंबई भारतीय जनता पार्टीने केला. सहा भाजपा जिल्हाध्यक्ष निवडणुकीचे संयोजक आहेत. नगरसेवक, पदाधिकारी स्थानिक पातळीवर सक्रिय आहेत. भारतीय जनता पक्षाने पाच वर्ष प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली आहे, म्हणूनच 'अबकी बार चारसो पार' असे आम्ही आत्मविश्वासाने म्हणत आहोत", असेही आशिष शेलार म्हणाले.