मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा महाविकास आघाडीवर (Maha Vikas Aaghadi) हल्लाबोल सुरुच आहे. परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) आणि शिवसेना खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांना ईडी (ED) ने नोटीस पाठवल्यानंतर किरिट सोमय्या यांनी आता ठाकरे सरकारमधील नेत्यांवर घोटाळ्याचा आरोप केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारशी संबंधित 11 जणांवर घोटाळ्याचा आरोप करत त्यांच्या उल्लेख 'घोटाळा इलेव्हन' (Scam Eleven) असा केला आहे. 
किरीट सोमय्या यांनी ट्विट करत अकरा जणांच्या नावाची यादी दिली आहे. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, परिवहन मंत्री अनिल परब, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ अशा 11 जणांची नावं आहेत.


शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी अनधिकृत बांधकाम केलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या वसुली कांडात ईडीने पुरावे दिले. परिवहन मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट, परिवहन विभागात चौकशी, शिवसेना खासदार भावना गवळी यांनी बँकेचे पैसे लाटले, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी गाळे ढापले, माजी मंत्री रवींद्र वायकर आणि रश्मी ठाकरेंनी मिळून जमीन घोटाळा केला. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांची एसआरएचा भूखंड प्रकरणी चौकशी सुरु, छगन भुजबळ यांच्यावर आरोप आहेत. शिवसेना आमदार यामिनी जाधव आणि यशवंत जाधव यांनी UAEमध्ये पैसे पाठवले तर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी अनधिकृत बंगला बांधला आणि पाडला' असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.